सार

जर आपल्याकडे वेळ कमी/अपुरी असेल आणि कुठल्याही गोष्टीचा (उदा. जीवनाचा, एखाद्या भावनेचा, नात्यांचा, ज्ञानाचा इ.) सार घ्यायचा असेल तर तो […]

जर आपल्याकडे वेळ कमी/अपुरी असेल आणि कुठल्याही गोष्टीचा (उदा. जीवनाचा, एखाद्या भावनेचा, नात्यांचा, ज्ञानाचा इ.) सार घ्यायचा असेल तर तो आपण:

  1. थोरा-मोठ्यांच्या/आजोबा/वृद्ध/अनुभवी माणसांच्या सान्निध्यात राहून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
  2. विविध साहित्य/पुस्तके वाचून कमी वेळेत घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
  3. कुठलीही एखादी कथा ऐकून (चित्रपटाची इत्यादि ची कथा पाहून). आणखी कमी वेळ असेल तर
  4. एक एक तासांची व्याख्याने ऐकून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
  5. 5-10 मिनिटांच्या (वेळ पडली तर काही निवडक) गाण्याच्या Lyrics ऐकून/वाचून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
  6. एक दोन परिच्छेद असलेल्या सुविचारातून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
  7. एक दोन ओळींच्या म्हणी ऐकून/वाचून घेऊ शकतो.

Leave a Comment

Scroll to Top